Advertisement

पुण्यातला व्यक्ती बीड जिल्ह्यात पाँझिटिव्ह, अंत्ययात्रेत लावली उपस्थिती

प्रजापत्र | Sunday, 26/07/2020
बातमी शेअर करा

केजः बनसारोळा येथील मुळ रहिवासी असलेला आणि पुण्यात राहत असलेला एक व्यक्ती पाँझिटिव्ह आढळला असुन त्याने बनसारोळा येथे अंत्ययात्रेत उपस्थिती लावली आहे. यामुळे बनसारोळा गावात चिंतेचे वातावरण आहे.
बनसारोळा येथील रहिवासी असलेल्या या इसमाचे वडील वारल्याने तो पुण्याहुन आला होता. त्याचा पुणे येथे स्वँब घेण्यात आला होता. तो पाँझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली असुन यामुळे बनसारोळा गावात चिंतेचे वातावरण आहे

Advertisement

Advertisement