Advertisement

जानेगावमध्ये महिलेचा खून?

प्रजापत्र | Thursday, 25/03/2021
बातमी शेअर करा

केज दि.२५ - केजपासून जवळच असणाऱ्या व युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जानेगाव येथे एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह घराच्या बाजूला आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
          तालुक्यातील जानेगाव येथील अनिल चटप यांचे कुटुंब गावच्या बाजूला शेतात वास्तव्यास आहे. दरम्यान गुरुवारी (दि.२५) रोजी रात्री आठच्या दरम्यान आशा अनिल चटप ही महिला घरी एकटीच होती. तर तिचे पती अनिल चटप हे दूध घालण्यासाठी गावात गेले होते. परंतु ते जेंव्हा घरी आले तेंव्हा पत्नी घरात दिसून न आल्याने त्यांनी इकडे तिकडे शोध घेतला असता घरापासून जवळच आशा यांचा मृतदेह आढळून आला. शरीरावर दगडाने ठेचल्याच्या खुणा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असून नेमका प्रकार काय घडला हे स्पष्ट झाले नसून युसुफ वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासात घटनेचा उलगडा होईल.

Advertisement

Advertisement