Advertisement

कोरोनाने जिल्ह्यात हातपाय पसरले

प्रजापत्र | Saturday, 13/03/2021
बातमी शेअर करा

बीड-शहरीभागासोबत ग्रामीण भागात ही कोरोनाने आता पाय पसरले असून शनिवारी (दि.१३) आरोग्य विभागाच्या अहवालात १८१ पॉझिटिव्ह सापडले आहेत.यावेळी १५१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
          सध्या बीड जिल्ह्यात कोरोना मागील दोन दिवसांपासून द्विशतकाच्या जवळ पोहचला आहे.आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ३३,आष्टी १८,बीड ८२,गेवराई १२,केज १२,माजलगाव ५,परळी ७,पाटोदा २,शिरूर ५ आणि वडवणीत ५ रुग्ण आढळून आले आहेत.

Advertisement

Advertisement