Advertisement

इंधन दरवाढीने त्रस्त असणाऱ्यांसाठी आहे ही बातमी

प्रजापत्र | Sunday, 07/03/2021
बातमी शेअर करा

बीड-पेट्रोल दरात राज्य शासनाकडून एक ते दोन , तर केंद्र सरकारकडून सात ते आठ रुपये कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे भाव अक्षरश: गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्यांसह मालवाहतुकदार, रिक्षाचालक, टॅक्सीचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला, कडधान्ये, तेल आदींवर झाला आहे.
सर्वसामान्यांचा वाढता रोष पाहून राज्य शासनाने सोमवारी (दि.८) इंधनावरील कर एक ते दोन रुपयांनी, तर केंद्र शासन ७ ते ८ रुपयांनी दर कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल ९७.५५ रुपयांचे नव्वद रुपयांवर, तर डिझेल ८३.९९ रुपये प्रतिलिटर आहे. ७६ रुपयांवर येईल.आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव प्रति बॅरेल कमी आहेत. मात्र, कराचा अतिरिक्त बोजा टाकून पेट्रोल भाव ९७.५५, तर डिझेल ८३.९९ इतके प्रतिलिटर झाले आहे. ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे रोष वाढू लागला आहे. याची जाणीव केंद्र सरकारला झाल्यामुळे हे दर आता कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement