Advertisement

बीड जिल्ह्यातील 20 खाजगी हॉस्पिटल्स ला कोरोना लसीकरणाची मान्यता

प्रजापत्र | Sunday, 28/02/2021
बातमी शेअर करा

बीड दि. 28 -  मागच्या 16 तारखेपासून कोव्हिड योध्यांना लसीकरणास सुरुवात झालेली आहे. तर उद्यापासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये आणखी व्यापकता येण्यासाठी देशातील कांही प्रमुख खाजगी हॉस्पिटलला लसीकरणाची मान्यता दिली असून लवकरच खाजगी हॉस्पिटलमध्ये अधिकृत लसीकरणाला सुरुवात होईल. बीड जिल्ह्यातही एकूण 20 खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे.
             दरम्यान बीड शहरातील यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल, विठाई हॉस्पिटल, तिडके हॉस्पिटल, प्रशांत हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल, पॅराडाईज हॉस्पिटल,  वीर हॉस्पिटल, शुभदा हॉस्पिटल, लाईफ लाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर हॉस्पिटल, माणिक हॉस्पिटल गेवराई तर केज शहरातील योगिता नर्सिंग होम,  माजलगाव येथील यशवंत हॉस्पिटल व साबळे हॉस्पिटल. तसेच परळी येथील मुंडे चिल्ड्रेन हॉस्पिटल, श्री. संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, कराड हॉस्पिटल आणि पार्वती नर्सिंग होम इत्यादी हॉस्पिटल्स चा समावेश आहे.
          सदरील हॉस्पिटलमध्ये केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीत लस देण्यात येणार असून लसीकरणासाठी 250 ते 350 रुपये एवढा खर्च येण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement