Advertisement

केज शहरात पुन्हा भरदिवसा घरफोडी

प्रजापत्र | Wednesday, 10/02/2021
बातमी शेअर करा

 केज दि.१० -  शहरातील एका खानावळ चालकाचे घर फोडून दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा केज-कळंब रोड लगतच्या कामगार नगर मध्ये भरदुपारी अज्ञात चोरट्यानी घराचे कुलूप तोडून कपाटातील साडेचार तोळे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

           केज येथील केज-कळंब रोड लगतच्या कामगार नगर येथे पोपट नवनाथ मुळे यांचे आरसीसी घर आहे. दि. १० फेब्रुवारी, बुधवार रोजी सकाळी १० वा. पोपट मुळे हे चिंचोली माळी येथील त्यांच्या दुकानात गेले होते. तर त्यांची पत्नी ही घराला कुलूप लावून साबला या गावी गेली होती. दुपारी २ वा. च्या दरम्यान पोपट मुळे हे केज येथे घरी आले असता त्यांना घराचे दार उघडे असल्याचे आढळून आले. तसेच कुलूप देखील तुटून पडले असल्याचे दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे ३.५ ग्रॅमचे गंठन, प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, १ ग्रॅम वजनाचा एक बदाम व एक अर्ध्या ग्रॅम वजनाची बाळाची अंगठी. असे एकूण साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे चैन व वाळे असा एकूण १ लाख ३४ हजार रु. ऐवज चोरी गेल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे व बाळासाहेब अहंकारे यांनी भेट दिली असून पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement