Advertisement

पाणी देण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 10/02/2021
बातमी शेअर करा

केज दि.१० - तालुक्यातील बनसारोळा येथे मंगळवारी रात्री मोटार चालू करण्यास गेलेल्या एका 55 वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
      भीमराव दशरथ गोरे हे मंगळवारी रात्री ६/१ सर्वे नंबर मध्ये असलेल्या शेतातील विहिरी वरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मात्र मोटार चालू करताना त्यांना विजेचा शॉक बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सदरील घटना बुधवारी सकाळी उघड झाल्यानंतर युसूफ वडगाव चे एपीआय आनंद झोटे, श्री.आटोळे यांनी घटनास्थळी दिली. तर बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक पांडुरंग वाले हे करत आहेत.

Advertisement

Advertisement