Advertisement

केज शहरात तरुणीची आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 09/02/2021
बातमी शेअर करा

केज दि. ९ - शहरातील धारूर रोडवरील भवानी नगर येथे एका 18 वर्षीय मुलीचा मृतदेह घरातील पंख्याला साडीने गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
        तेजल संपत चव्हाण असे सदरील तरुणीचे नाव असून मंगळवारी सदरील घटना उघडकीस आली. सहायक फौजदार महादेव गुजर यांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement