Advertisement

मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

प्रजापत्र | Monday, 08/02/2021
बातमी शेअर करा

केज दि. 8  - तालुक्यातील कुंबेफळ येथील रहिवासी बाबुराव जाडकर यांचा एका निर्वस्त्र तरुणाने केलेल्या मारहाणीत जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.
       केज तालुक्यातील कुंबेफळ येथील रहिवासी बाबुराव जाडकर अंदाजे वय 85 हे कुंबेफळ - सारणी (आ) रोडवर खडी क्रेशर जवळ असलेल्या शेताच्या कडेला बसलेले होते. दरम्यान तिथे अचानक एक निर्वस्त्र असलेला तरुण आला व त्याने सदरील वृद्धास दगडाने डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सदरील तरुण हा नेमका कुठला आहे? त्याने मारहाण का केली ? हे अद्याप स्पष्ट झाले नसून युसुफवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला करणाऱ्या तरुणास ताब्यात घेतले आहे.

Advertisement

Advertisement