Advertisement

केज तालुक्यातील शिक्षकाचा अपघाती मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 24/01/2021
बातमी शेअर करा

 केज-औंढा नागनाथवरून देवदर्शन करून नांदेडकडे आजारी नातेवाईकाला भेटण्यास निघालेल्या शिक्षकाच्या पोलो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यु झाला असून गाडीचे टायर फुटल्याने ३० फूट खोल नदीत कार कोसळली. 
                 केज तालुक्यातील सारणी सांगवी शाळेवरील शिक्षक सारंग बळीराम काळे (वय-५१ रा.जीवाचीवाडी ता.केज) हे व त्यांचे अन्य तिघे नातेवाईक दि.२४ रोजी औरंगाबाद वरून कारने (एम.एच.२० सीएच ७५८९) आजारी नातेवाईकाला भेटण्यास निघाले होते. प्रवासा दरम्यान औंढा नागनाथ देवस्थान असल्याने त्यांचे साडू, मेव्हणा आणि मेव्हण्याची पत्नी या सर्वांनी दर्शन घेतले व सकाळी १०.३० वाजता नांदेडकडे निघाले. मात्र औंढया पासून पुढे २० किमी अंतरावर असलेल्या पूर्णा नदीवरील पुलावर आले असता गाडीचे टायर फुटले. त्यामुळे गाडी वरील नियंत्रण सुटले व पुलाला कठडे नसल्याने गाडी सुमारे ३० फूट नदीत कोसळली यात काळे हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांना नांदेडच्या विष्णुपुरी रुग्णालयात हलवले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अन्य तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काळे यांच्यावर विष्णुपुरी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement