Advertisement

''या" नागरिकांना लसीकरणातून वगळण्यात येणार - ना.राजेश टोपे

प्रजापत्र | Wednesday, 13/01/2021
बातमी शेअर करा

पुणे दि.१३ - कोरोनाची लस ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आलं असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.18 वर्षांखालील लहान मुलं, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

              16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटमधून निघालेला कोरोना लसींचा साठा राज्यातील आठ प्रमुख डेपोंमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे. त्यानंतर 15 तारखेच्या रात्रीपर्यंत या लसी ग्रामीण, जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होतील. त्यानंतर 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement