Advertisement

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरु केलेल्या मागणीला यश आल्याचे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाने तिन्ही कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणी करण्यास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या कायद्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यी समिती स्थापन करण्यास सांगितले आहे, या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत, असे शरद पवार आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले.
'गेल्या दीड महिन्यांपासून थंडी, वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांसाठी हा मोठा दिलासा आहे. मला आशा आहे की केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात आता ठोस संवाद साधला जाईल, जेणेकरून लोकांचे हितसंबंध लक्षात ठेवले जातील' असा टोलाही पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला

Advertisement

Advertisement