Advertisement

कोणत्या तारखेला होणार कोरोना लसीकरण ?

प्रजापत्र | Saturday, 09/01/2021
बातमी शेअर करा

दिल्ली : सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली. देशात येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे.
लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील.“आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना लसीकरणात पहिले प्राधान्य असेल. त्यांची संख्या तीन कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाचे लोक. या सर्वांची मिळून संख्या २७ कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे” असे केंद्राने म्हटले आहे.

 

Advertisement

Advertisement