Advertisement

पन्नास हजारांची लाच घेताना तलाठ्यासह एकाला पकडले

प्रजापत्र | Saturday, 09/01/2021
बातमी शेअर करा

केज :पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी न दाखविण्यासाठी १ लाखाची लाच तलाठ्याने मागितली होती.तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारताना तलाठी व त्याच्या सह्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.9) केज तहसीलच्या आवारातील टाकळी सज्जाच्या (अनधिकृत) कार्यालयाजवळ पकडले.
दयानंद शेटे (वय ५०) असे लाचखोर तलाठ्याचे तर सचिन घुले (वय ३१) असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे. सहाय्यकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडून पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी न दाखविण्यासाठी तब्बल १ लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सहाय्यकाकडून ५० हजार रुपये स्वीकारताना ‛एसीबी’च्या पथकाने रंगेहाथ पकडले. दोघा लाचखोराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

Advertisement

Advertisement