Advertisement

परभणीत अचानक ९०० कोंबड्यांचा मृत्यु

प्रजापत्र | Friday, 08/01/2021
बातमी शेअर करा

परभणी-परभणीच्या मुरुंबा गावात अचानक ९०० पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन विभागाने गावात भेट देऊन मृत पक्षांचे नमुने पुण्याला पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान याचा संसर्ग वाढू नये म्हणून मुरुंबा आणि आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात कुक्कुट विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. अहवाल आल्यानंतरच कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल

 हेही वाचा 

                  परभणीच्या मुरुंबा गावातील शेतकरी विजय झाडे यांच्या १००, रामचंद्र प्रजापती यांचे १००,प्रभाकर झाडे यांचे ५०० तर विठ्ठल झाडे यांचे २०० कोंबडे असे मिळून ९०० पेक्षा जास्त कोंबडे मागील दोन दिवसांपासून मृत्युमुखी पडत आहेत. त्यांनी याबाबत जेव्हा पशुसंवर्धन विभागाला सांगितले तेव्हा पशुसंवर्धन विभागाचे पथक गावात पोहोचले असून मृत कोंबड्यांचे नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशाससाने पत्रक काढून मुरुंबा आणि आसापासच्या पाच किलोमीटर परिसरात कुक्कुट खरेदी, विक्री बाजारावर प्रतिबंध लावले आहे. इतर कुठेही असे प्रकार झाल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाला सूचना द्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही : सुनील केदार

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबवण्यात येत असून पुढेही सातत्याने राबवण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केद यांनी सांगितले 

Advertisement

Advertisement