बीड-अवैध वाळू वाहतुकीमुळे चर्चेत आलेल्या गोदापात्रात महसूल विभागाने कारवाई करत एकाच दिवशी ७ हायवा लावल्यानंतर आता चकलांबा पोलिसांनी गोदापात्रात उतरून कारवाईचा दणका दिला आहे.या कारवाईत दोन हायवा जप्त करण्यात आल्या असून यात ६० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याचे कळते.गायकवाड जळगाव व मालेगाव शिवारात या कारवाया झाल्या आहेत.
बुधवार दि.१० रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास गायकवाड जळगाव व मालेगाव खु. शिवारात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतुकीवर करणाऱ्या दोन हायवांवर वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी दोन भारत बेन्झ कंपनीचे हायवा जप्त केले असून त्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. एकूण ६० लाख ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.या प्रकरणी प्रदीप बंकट कदम (वय-26 रा. सुरळेगाव),रत्नेश्वर उर्फ बाळू शहादेव खेडकर (वय-३३ रा. चकलांबा,ता. गेवराई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समिर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन इंगळे, पोह/बांगर, पोना/गुजर, पोलीस अंमलदार मुकेश बनसोडे, रमेश बारगजे, हनुमान इंगोले यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
