बीड-शहरातील कालिका नगर भागातील चऱ्हाटा रोडवर सोमवारी (दि.11) सकाळी 8 च्या सुमारास एका 32 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.रविवारी रात्री त्याची हत्या करण्यात आल्याचा अंदाज असून घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पीआय साईनाथ ठोंबरे, ग्रामीणचे पीआय संतोष साबळे यांनी भेट दिली आहे. 
     प्रकाश बळीराम गायकवाड (वय-32 रा. न्यू भगवान इंग्लिश स्कुलच्या बाजूला कपिलमुनी नगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी प्रकाश गायकवाडचा मृतदेह कालिका नगरच्या पुढे असलेल्या मोकळ्या मैदानावर आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान प्रकाश हा अनिल लाईट हाऊसवर कामाला होता.रविवारी रात्री त्याचा खून झाल्याचा अंदाज असून सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
