Advertisement

सराफा व्यापाऱ्याला लूटणाऱ्यांना पोलिसांनी तासाभरात पकडले !

प्रजापत्र | Tuesday, 19/03/2024
बातमी शेअर करा
गेवराई - तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील मनूबाई जवळा परिसरातून एक - सराफा व्यापारी धनसांवगी याठिकाणी जात असतांना मनूबाई शिवारात तिघांनी लुटले. घटनेची माहिती मिळताच तलवडा, गेवराई पोलीसांनी चक्र फिरवून, नाकाबंदी करुन तिघांना ताब्यात घेतले. सदरील घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सराफा व्यापारी व्यापारासाठी तलवाडा परिसरातील मनूबाई जवळा या मार्गे धनसांवगी याठिकाणी जात होता.
 
 
रस्त्यातच तिन चोरटे वाट पाहत दबा धरूण बसले होते. व्यापारी येताचधारदार शस्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील लाखो रुपये किमतीचे सोने, चांदी यासह रोख रक्कम घेऊन पोबारा केला व्यापाऱ्याने तात्काळ तलवाडा व गेवराई पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि.सोमनाथ नरके व गेवराई पोलिस ठाण्याचे सपोनि.संतोष जंजाळ, सपोनि दिपक लंके यांनी तपासाची चक्रे फिरवून एक तासात तीन संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून यात एक गेवराई तर दुसरा अंबडचा आरोपी असल्याचे समजते. तीसऱ्या आरोपी बाबतीत काहीच माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींची व सराफा व्यापाऱ्याचे नाव समोर येईल.
 

Advertisement

Advertisement