Advertisement

कुस्तीपटु राहुल आवरे यांच्या दुकानात चोरी

प्रजापत्र | Monday, 04/01/2021
बातमी शेअर करा

पाटोदा-येथील जामखेड रोडवरील आर.के.मार्ट या सुपर मार्केट शॉपीवर रविवारी (दि.४) चोरटयांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु व डीवायएसपी राहुल आवारे यांच्या वडिलांचे हे दुकान असून राहुल आवारे यांचे रविवार लग्न होते.यामुळे घरातील सर्व मंडळी पुण्याला होती,आणि याचा फायदा चोरटयांनी उचलला.

                    आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु राहुल आवारे हे पाटोद्याचे भुमिपुत्र आहेत. त्यांनी पाटोदा शहरात अवघ्या दोनच दिवसांपुर्वी जामखेड मुख्य रोड परीसरात आर.के. मार्ट ही सुपर मार्केट शॉपी सुरु केली आहे. मोठया थाटात या शॉपचे उद्धाटन करण्यात आले होते. रविवारी डीवायएसपी राहुल आवारे यांचा पुण्यात विवाह सोहळा होता. यासाठी संपुर्ण आवारे कुटुंब पुण्यात होते. हाच डाव अज्ञात चोरटयांनी साधला व पहाटे अंदाजे 2.30 ते 3 च्या दरम्यान मार्टचे कुलुप तोडत आत प्रवेश केला.

चोरट्यांनी प्रथम येथील सीसीटीवी किट डीव्हीआर सह तोडले आणि नंतर दुकानातील सर्व ड्रायफुट, इतर वस्तू, काॅस्मेटीक सह माल लंपास केला. सोमवारी सकाळी ही घटना ऊजेडात आली व त्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

 

Advertisement

Advertisement