Advertisement

नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न

प्रजापत्र | Friday, 01/03/2024
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ - शहराची मध्यवर्ती संस्था असलेल्या नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यातून समोर आला.या प्रकरणी आता अज्ञात तीन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दोन हाॅल व ११ कपाटांची  कुलूपे तोडली पण काही चोरीस गेले नसल्याचे नगर परिषद प्रशासनाने फिर्यादीत सांगितले आहे.

       परळी वै. नगर परिषदेच्या केंद्र कार्यालयात गुरुवारी (दि.29) पहाटे 3.15 वा.सुमारास यातील अज्ञात तीन अनोळखी इसम हे तोंडाला बांधून नगर परिषदेच्या केंद्र कार्यालयात दक्षीणेकडील दरवाज्याचे कुलूप तोडुन घुसले. कार्यालयामधील 11 कपाटाचे व दोन हॉलचे कुलूप तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातून व कार्यालयातील कपाटातून काहीही चोरी गेलेले नाही. अशी फिर्याद नगर परिषद कर्मचारी प्रविण प्रभाकर मोगरकर यांनी नोंदवली आहे. यावरुन पोलीस स्टेशन परळी शहर येथे अनोळखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोह/ 1137 वळवी हे करत आहेत.  
 

Advertisement

Advertisement