Advertisement

चालकाचा घात कि अपघात ;ट्रॅक्टरच्या टायरखाली आढळला मृतदेह

प्रजापत्र | Thursday, 08/02/2024
बातमी शेअर करा

परळी-  विटभट्टीवरील पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून कामाला असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह रात्री टँकरच्या चाकाखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. चालक सकाळी डब्बा घेऊन कामावरगेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्याने त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते, मात्र सदरील चालकाचा मृतदेह चाकाखाली आढळून आल्याने हा अपघात आहे की घातपात? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. चालकाचा खून केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

 

 

   सविस्तर माहिती अशी कि, आकाश सुरेश रोडे (वय ३० वर्षे रा. टोकवाडी) हा विटभट्टीवरील पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून कार्यरत होता. काल सकाळी तो घरी येऊन डबा घेऊन कामावर गेला होता. रात्री सात वाजेपर्यंत तो घरी परतला नसल्याने त्याच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तो उशिरापयर्ंत आढळून आला नाही. साडेदहा वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृतदेह विटभट्टीवरील टँकरच्या पुढच्या चाकाखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. चालकाचा अपघात झाला की त्याला मारण्यात आले, असा प्रश्‍न उपस्थित होत असून आकाश रोडे याचा खून करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. पोलिसांंनाही या घटनेबाबत संशय असून हा घातपात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, माझा मुलगा आकाश रोडे याचा टोकवाडी येथे मृतदेह आढळला असून त्याचा खूनच करण्यात आला. आम्हाला कसलीही कल्पना न देता मृतदेह रुग्णालयात आणला असून या प्रकरणी दोषींविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी मयताचे वडील सुरेश रोडे यांनी पोलिसांकडे केली आहे.

Advertisement

Advertisement