Advertisement

सहलीला गेलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू

प्रजापत्र | Monday, 05/02/2024
बातमी शेअर करा

गेवराई- शहरातील जातेगाव रोडवर असलेल्या न्यु इरा इंग्लिश स्कुल या शाळेची सहल धार्मिक व पर्यटन स्थळी दोन दिवसापुर्वी गेली होती. या सहलीतील एक सात वर्षी वर्ग तिसरीत शिकणारी मुलगी सोलापूर शहरातील एका जलतरण तलावात सहलीचा पाण्यातील आनंद घेण्यासाठी गेवराई शहरातील केशवराज मंदिर जवळ, मोटेगल्ली येथील मुलीचा या तलावात व परिसरात पाणी नाकात गेल्यामुळे अथवा तिने काही पदार्थ खाल्ल्यामुळे तिची पोटातील उलटी घशातच आडकल्याने तिचा मृत्यू रविवार रोजी दुपारी झाला. तिच्या मृत्युची वार्ता गेवराई शहरात वाऱ्यासारखी पसरताच सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राजंली नितीन मस्के (वय ७) राहणार केशवराज मंदिर जवळ, मोटेगल्ली गेवराई जि. बीड असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे.

 

 

ती शहरातील जातेगाव रोडवर असलेल्या न्यु इरा इंग्लिश स्कुल या शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. या शाळेची सहल दोन दिवसापुर्वी महाराष्ट्रातील धार्मिक, पर्यटन व गड किल्ले बघण्यासाठी गेली होती. या दरम्यान रविवार दि. ४ रोजी दुपारच्या वेळी हि सहल सोलापूर शहरातील एका जलतरण तलावातील पाण्याचा आनंद घेण्यासाठी शाळेतील सर्व मुला मुलींना शाळा प्रशासनाने येथे नेले. यापुर्वी प्राजंली हिने काही पदार्थ खाल्ले होते, तर काही जणाच्या चर्चेवरुन ह्या मुलीच्या नाका तोंडात तलावातील पाणी गेले. त्यामुळे येथेच तिच्या पोटातील उलटी घशात आडकली त्यामुळे तिचा मृत्यू झाला. सोलापूर येथील पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुने प्राजंली मस्केचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. आज सोमवार रोजी सकाळी शवविच्छेदन होऊन तिचा मृतदेह सोलापूर येथे गेलेले तिचे नातलग घेऊन आणण्यासाठी रुग्णवाहिकेतून गेवराईकडे निघाले होते. दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच प्रांजलीचा नेमका मृत्यू नाका तोंडात पाणी गेल्यामुळे उलटी होऊन अथवा पदार्थ खाऊन उलटी घशात अडकली किंवा अन्य कारणाने झाला हे स्पष्ट होईल.

Advertisement

Advertisement