Advertisement

जनावरे बांधण्यावरून पती-पत्नीस मारहाण;पत्नीचा विनयभंग

प्रजापत्र | Sunday, 21/01/2024
बातमी शेअर करा

धारूर-  जनावरे बांधण्याच्या कारणावरून एकास मारहाण करण्यात आली. आपल्या  पतीस मारहाण होत असल्याचे पत्नीस समजल्यानंतर सदरील पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही माहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला ही घटना चिंचपूर रोडवर घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चिंचपूर रोडवरील एका व्यक्तीस मारहाण करण्यात आली. सदरील ही मारहाण परमेश्‍वर साखरे, बाबा साखरे, जिजा साखरे व अन्य एकाने केली. आपल्या पतीस मारहाण होत असल्याचे पत्नीस माहित झाल्यानंतर ती त्या ठिकाणी धावत आली. तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र तिलाही मारहाण करून तिचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात ३५४, ३२३, ५०५, ५०६, ३४ तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement