Advertisement

 परळीत तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 17/01/2024
बातमी शेअर करा

परळी - शहरातील समता नगर भागात राहणार्या एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरील तरूणाने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजु शकले नाही. संतोष गंगाधर दौंड (रा समता नगर, वय ३५ वर्षे) या तरूणाने आपल्या राहत्या घरी घराच्या आडूला गळफास घेवून आत्महत्या केली. मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. 

Advertisement

Advertisement