Advertisement

परळीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

प्रजापत्र | Friday, 12/01/2024
बातमी शेअर करा

  परळी- शहरातील महेश कॉम्प्लेक्स परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चौकशीसाठी २ महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

 

 अधिक माहितीनुसार, फ्लोरा स्पा या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिची परळी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून परळी शहर पोलिसांनी फ्लोरा स्पावर धाड टाकून कारवाई केलीय. या कारवाई दरम्यान त्या ठिकाणी पुण्याहून आलेल्या दोन महिलालांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खरचं येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू आहे का? याचा तपास आता परळी शहर पोलीस करत आहेत.

 

 

बीडमध्ये जुलै २०२३ मध्ये देखील अशीच एक घटना घडली हेती. एका कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली होती. तसेच या प्रकरणी ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.बीडमध्ये सातत्याने अशा घटना उघडकीस येत आहेत. सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्टेशन चौक येथील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता. सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सांगली आणि इतर जिल्ह्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement