Advertisement

पाटोद्यात दोन गटात राडा

प्रजापत्र | Monday, 06/11/2023
बातमी शेअर करा

पाटोदा - ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाटोद्यात आज (दि.६) दुपारी दोन गट आमने सामने आले. यावेळी झालेल्या तुफान राड्यात एकमेकांना काठ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. यावेळी गोंधळ वाढत असल्याचे पाहता पोलिसांनी हाणामारी करणाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. या प्रकारामुळे पाटोद्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन गटात झालेल्या वादाचा व्हिडिओ देखिल व्हायरल झाला आहे. 
 

Advertisement

Advertisement