Advertisement

रिक्षा- मोटरसायकल भिषण अपघातात एक ठार; दोन गंभीर जखमी

प्रजापत्र | Sunday, 20/12/2020
बातमी शेअर करा

वडवणी : खंडोबा यात्रेनिमित्त मोरवाडी गावी आलेल्या मुंजा भागवत जगताप  वय २५ या तरुणाचा पेट्रोल आणण्यासाठी  जात असताना रिक्षाला सामोरा समोर धडक बसून  झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज बाहेगव्हण फाट्याजवळ  घडली 
                   यात्रेनिमित्त गावाकडे आलेला तरुण पेट्रोल आणण्यासाठी स्पेंलन्डर  मोटारसायकल ( एम एच 12FJ 9495) वरून वडवणीकडे जात असताना बाहेगव्हण फाट्याजवळ रिक्षा क्र.Mh44.7921 आणि स्पेंलन्डर यांची सामोरा समोर जोरात धडक झाली.या अपघातात जगताप यांचा जागीच मृत्यू झाला तर केशव बबन अंडील वय 19 वर्ष रा. मोरवड आणि अमोल थोरात रा. ढाकेफळ  वय 22 वर्ष हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती होताच वडवणी  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा अधिक तपास वडवणी पोलिस करत आहेत. 

 

Advertisement

Advertisement