Advertisement

गॅस टाकीचा स्फोट

प्रजापत्र | Thursday, 03/08/2023
बातमी शेअर करा

शिरूर कासार - शहरातील शिवाजीनगर भागात आज सकाळच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाल्याची सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत. 

अधिक माहिती अशी कि, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अरुण मानकर हे शहरातील शिवाजीनगर भागात कातखडे यांच्या घरामध्ये भाडे तत्वावर राहतात. आज सकाळी ते वॉकिंग करण्यासाठी घराबाहेर पडले होते. या वेळी त्यांच्या घरात पत्नी आणि दोन लहान मुले होते. घरातील गॅस चहापाण्यासाठी  पेटवल्यानंतर गॅसचा भडका उडाला. आगीने अवघे किचन आपल्या विळख्यात घेतले. घरातून धूर निघत असल्याने आजुबाजुच्या लोकांनी आरडाओरड केली. तोपर्यंत आगीने मोठे स्वरुप धारण केले होते. त्यात गॅसच्या टाकीचा जबरदस्त स्फोट झाला आणि टाकीचे अवशेष खिडक्यांचे ग्रिल तोडून बाहेर पडले. स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की, परिसरातील लोकांना त्याचा आवाज गेला. या आगीत सुदैवाने घरातील सर्वजण बालंबाल बचावले असून मानकर यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ स्थानीक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Advertisement

Advertisement