Advertisement

पुणे-पिंपरी चिंचवडमधील चोरीच्या बाईकची परळीत विक्री

प्रजापत्र | Saturday, 18/03/2023
बातमी शेअर करा

परळी - येथील संभाजीनगर पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड पोलीसांनी परळीत दोन दिवसांपूर्वी  केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 14 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी परळीतील दोघांची कसून चौकशी चालू आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड येथून मोटरसायकल चोरून परळी व परिसरामध्ये विकल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यावरून पोलिसांनी  तपास सुरू केला. पिंपरी चिंचवड क्राईम युनिट-(दोन) येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, पिंपरी चिंचवड पुणे पोलीस क्राईम युनिट- (दोन), निगडी यांनी या प्रकरणाचा छडा लावत परळी पोलिसांच्या मदतीने संशयित दोघांना ताब्यात घेतले आहे. या तपासातून आतापर्यंत परळी व परिसरामध्ये पिंपरी चिंचवड व पुणे परिसरामधून चोरून विक्री केलेल्या 14 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आणखी मोटारसायकल जप्तीची कारवाई सुरू आहे.

ही कारवाई  बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, आंबाजोगाई च्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. नी. संभाजीनगर सलीम चाऊस, स.पो.नी महेंद्रसिंग ठाकूर, पो.नि.जितेंद्र कदम ( पुणे व टीम ),  परळी चे डी बी पथक प्रमुख व्यंकट भताने, सचिन सानप, चंद्रय्या ऐटवार, रुपेश शिंदे, अर्जुन मस्के, दत्ता गित्ते, सिराज पठाण, यांनी केली. 

 

वाहने कागदपत्रे पाहून खरेदी करा 
जुनी मोटार सायकल खरेदी करताना सर्व कागदपत्रांची  चौकशी करुनच खरेदी करावी़. ज्यांच्याकडे विना कागदपत्रांची वाहने असतील त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आवाहन संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement