Advertisement

दुचाकीच्या धडकेत; दोघांचा जागीच मृत्यू

प्रजापत्र | Friday, 27/08/2021
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२७ (वार्ताहार)- दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी सहाच्या सुमारास माजलगाव तेलगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर घडली. 
अरुण जगन्नाथ शेजूळ (वय ६५रा. आबेगाव), नंदकुमार संतराम महिपाल (वय ३८, रा.शिंदेवाडी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अरुण शेजूळ हे माजलगावहून खामगाव पंढरपूर महामार्गावरून दुचाकीवरुन शेतात जात होते. रिलायन्स पंपाजवळ आल्यानंतर त्यांनी अचानक गाडी वळवली. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या नंदकुमार संतराम मायकर यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. दुचाकीवरुन दोघेही रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडल्याने दोघांच्याही डोक्याला मार लागल्याने गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी दोघांनाही माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अरुण शेजूळ हे जलसंपदा विभागात अभियंता होते. दोन वर्षापासून ते निवृत्त झाल्याने शेती व्यवसाय करत होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement