Advertisement

वीज पडून एक महिला गंभीर तर दोन किरकोळ जखमी

प्रजापत्र | Saturday, 01/08/2020
बातमी शेअर करा

वडवणी-तालुक्यातील चिंचोटी येथे शेतात काम करणाऱ्या तीन महिलेवर वीज पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे.तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१) दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान घडली.या महिलेला बीड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
                        तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून वीज पडण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.तालुक्यातील चिंचोटी येथे भिमराव त्रिंबक गोंडे यांच्या गावाशेजारील मोरवंडी शेतात काम करत असलेल्या तीन महिला जोराचा पाऊस आल्याने बोरीच्या झाडाखाली थांबल्या होत्या त्यांच्या शेजारी अचानक वीज कोसळली.यामध्ये शितल दादाराव गोंडे,केशरबाई रामकिसन गोंडे या किरकोळ जखमी झाल्या तर सत्यभामा अंकुश गोंडे या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ बीड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  

 

 


 

Advertisement

Advertisement