Advertisement

बीड जिल्ह्यात आणखी १९ पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Wednesday, 15/07/2020
बातमी शेअर करा

बीडः बीडमधुन रविवारपासून पाठविण्यात आलेले अनेक अहवाल प्रलंबित होते, त्यात बुधवारी सकाळी १९  नमुने कोरोना positive आल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. यात  परळीमधील ६ ,बीडमधील ७ यासह माजलगाव १, अंबाजोगाई २ ,आष्टी १ आणि गेवराई २  रुग्णांचा समावेश आहे. आज positive आढळलेल्या रुग्णांमध्ये बलात्कार प्रकरणातील एका आरोपीचाही समावेश असल्याची माहिती असुन यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. बीड तालुक्यतील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये माळीवेस मधील १,शाहूनगर मधील १,लिंबा (ता.बीड) येथील १ यासह बीड शहरातील इतर चार रुग्णांचा समावेश आहे.
तर परळीच्या भीमनगर,सिद्धार्थ नगर,इंदीरा नगर,जुने रेल्वे स्टेशन येथील प्रत्येकी १ रुग्ण तर गेवराईच्या तलवाडा येथील १ आणि गेवराई शहराच्या रंगार चौक येथील १ चा समावेश आहे. आष्टी शहराच्या दत्त मंदिर गल्ली भागातील १ तर अंबाजोगाईच्या विमल सृष्टीमधील १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.माजलगाव तालुक्याच्या जदीद जवळा १ जण पॉझिटिव्ह आढळला आहे. बीडमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांनी आपापले व्यवहार पार पाडताना अधिकची काळजी घेण्याची गरज आहे.

 

Advertisement

Advertisement