Advertisement

पोलीसांना गुंगारा देणार्‍या हनुमान महाराजांची जामिनासाठी धाव

प्रजापत्र | Monday, 22/02/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 
गेवराई दि.22 - विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियावर आपण आत्महत्या करत आहोत असा व्हिडीओ व्हायरल करुन गायब झालेल्या आणि तब्बल 15 दिवसांपासून पोलीसांना गुंगारा देणार्‍या तालुक्यातील काळेगाव येथील हनुमान महाराज गिरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचा जामिना अर्ज न्यायालयात दाखल झाला आहे. 

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील सुर्य मंदिर संस्थानातील हनुमान महाराज गिरी यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी तसेच बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गून्हा दाखल आहे परंतू सदरचा गून्हा हा केवळ ब्लॅकमेंलीगसाठी असून गावातील राजकिय पुढारी, पत्रकार, यांनी तसेच फिर्यादीच्या नातेवाईक यांनी मला चार लांख रूपयाची मागणी केली होती.  मी ती मागणी पुर्ण केली नाही म्हणून माझ्यावर खोटा गून्हा दाखल केल्याने मी आत्महत्या करत आहे असा व्हिडीओ हनुमान महाराज यांनी सोशलमिडीयावर व्हायरल केला होता. या व्हिडीओने सर्वत्र खलबळ माजली मात्र तेव्हापासून हनुमान महाराज गायब होते. महाराज नेमके कोठे आहेत याचा शोध पोलीस यंत्रणा घेत होती. अखेर महाराज पंढरपूरला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता. दरम्यान आता पोलीसांना गुंगारा देणार्‍या हनुमान महाराज गिरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी थेट बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. न्या.के.आर.पाटील यांच्यासमोर हनुमान महाराज गिरी यांचे अटकपूर्व जामिनाचे प्रकरण चालणार आहे. हनुमान महाराज गिरी यांनी आपण आत्महत्या करत आहोत असा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर सर्वात अगोदर प्रजापत्रनेच महाराज जीवंत असल्याचा दावा केला होता. 
 

Advertisement

Advertisement