Advertisement

रायमोह ग्रामीण रुग्णालयात कोरोना बधिताचा मृत्यू

प्रजापत्र | Sunday, 21/02/2021
बातमी शेअर करा
 बीड– रायमोह ग्रामीण रुग्णालयात रविवारी सकाळी कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे .दगडवाडी येथील या रुग्णाला सकाळी तपासणी साठी आणण्यात आले होते,त्यानंतर त्याचा मृत्यू झाला .
 
बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे .बीड,अंबाजोगाई तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे .रायमोह नजीक असलेल्या दगडवाडी या गावातील विघ्ने नामक 55 वर्षीय रुग्णाला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले,या रुग्णाची अँटिजेंन टेस्ट करण्यात आली,रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला .
 
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे, रायमोह येथे आज रविवारी आठवडी बाजार असून या ठिकाणी ग्रामस्थ विना मास्क फिरत असल्याचे चित्र आहे .या मृत व्यक्तीवर त्याचा गावाकडे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

Advertisement

Advertisement