Advertisement

धारूर शहर दक्षता समिती वर दोन पञकाराची निवड

प्रजापत्र | Wednesday, 10/02/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-( प्रतीनीधी) धारूर शहर दक्षता समिती वर दोन पञकाराना संधी मिळाली असून अध्यक्ष पदी सय्यद शाकेर तर सदस्य पदी अनिल महाजन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. 
धारूर शहरात व तालूक्यात सामाजीक क्षेञात सतत अग्रेसर असणारे व तालूक्याचे विकासाचे प्रश्न मांडून  सर्वसामन्यास न्याय देण्या साठी धडपडणारे अनेक वर्षा पासून पञकारीता क्षेञात काम करणाऱ्या दोन पञकराना शहर दक्षता समिती वर काम करण्याची संधी धारूर तालूक्यात स्थानीक आ.प्रकाशदादा सोंळके यांचे शिफारशी मुळे मिळली असून या शहर दक्षता समितीचे अध्यक्षपदी मराठी पञकार परीषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर यांची तर सदस्य पदी जेष्ठ पञकार अनिल महाजन यांची निवड केली आहे .या समिती वर दोन पञकाराना संधी दिल्याने त्यांचे निवडीचे सर्वञ स्वागत होत असून त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे

Advertisement

Advertisement