Advertisement

''ती'' गाडी कुणाची? अपघात की अन्य कांही ?

प्रजापत्र | Sunday, 07/02/2021
बातमी शेअर करा

केज दि. 7 - शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कानडी रोडवर सोनार ओढ्याच्या जवळ एक ओमीनी गाडी बेवारस अवस्थेत पडलेली दिसून आली आहे. त्यामुळे तर्क वितर्क लढवल्या जात आहेत.
        केज कानडी रोडवर असलेल्या ओढ्याजवळ एक निळसर कलरची कर्नाटक पासिंगची ओमीनी गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडलेली सकाळी दिसून आली आहे. सदरील गाडीचे काच पूर्णपणे फुटलेले असून समोरच्या बाजूला दबलेली दिसून येत आहे. सदरील गाडी नेमकी कुणाची ?  अपघात की ? कुणी सोडून गेले ? याबद्दल तर्क वितर्क लढवले जात असून बिट अंमलदार श्री. लोखंडे यांना कल्पना दिली असून ते घटनास्थळी दाखल होत आहेत.

Advertisement

Advertisement