Advertisement

विठुरायाच्या जमिनीचे उत्पन्न वर्षाकाठी लाखोंच्या घरात........! दीडशे गावांत पसरलीय जमीन......!

प्रजापत्र | Monday, 01/02/2021
बातमी शेअर करा

बीड दि.1 - श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला भाविकांनी दान स्वरूपात दिलेल्या जमिनी राज्यातील 156 गावांमध्ये विखुरलेल्या आहेत. त्याचे एकूण क्षेत्र हेक्टर 942.04 आर. म्हणजेच 2355 एकर आहे. त्यापैकी 408.72 हेक्टर आर. म्हणजेच 1021 एकर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. त्यावर मंदिर समितीचे नाव दाखल केले आहे असून आणखी 1 हजार 334 एकर जमिनींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

          दरम्यान विठूरायावर नितांत श्रध्दा असलेल्या भाविकांनी विठ्ठलास जमिनी दान स्वरुपात दिलेल्या आहेत. या दान स्वरुपात दिलेल्या जमिनी मंदिर समितीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 2355 एकरपैकी 1021 एकर जमिनी ताब्यात घेतल्या आहे. तर उर्वरित 1334 एकर जमिनींचा शोध घेतला जात आहे. तर 1021 एकरपैकी 102.16 आर.क्षेत्र शेतकर्‍यांना लिलाव पध्दतीने शेतकर्‍यांना भाडेपट्ट्याने दिले आहे. यातून वर्षाकाठी मंदिर समितीला 11 लाख 56 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे.

               कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये 113 एकर जमिनीवर नाव दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जमिनीवर नाव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या जमिनीपैकी हेक्टर 102.16 आर इतके क्षेत्र शेतकर्‍यांना लिलाव पध्दतीने 11 महिन्यांसाठी खंडाने देण्यात येत आहेत. त्यामध्ये यावर्षी 11.56 लाख इतके उत्पन्न मिळाले आहे.

             

Advertisement

Advertisement