Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 30/01/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) तालुक्यातील पहाडी पारगाव येथील २५ वर्षाच्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने उपचारा दरम्यान शुक्रवारी  मृत्यू झाल्याची घटना घडली. गोपाळ शिवाजी अंडील असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की, तालुक्यातील पहाडी पारगाव येथील तरुण गोपाळ शिवाजी अंडील (२५) हा थेटेगव्हाण येथील चौकात पंक्चरचा व्यवसाय करीत होता. गावाकडून आपल्या दुकानाकडे स्प्लेंडर दुचाकीवरुन जात असताना प्रजासत्ताक दिनी दि.२६ मंगळवार रोजी सकाळी ९ च्या सुमारास अज्ञात वाहनाने त्याला उडवले. यात गंभीर जखमी होवून रस्त्यावर आढळलेल्या तरुणास ग्रामस्थांनी उपचारासाठी धारुरला हलवले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तरुणास लातुर येथे खाजगी दवाखान्यात पाठवण्यात आले. चौथ्या दिवशी दि.२९ शुक्रवारी लातूर येथे उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाने पहाडी पारगाव व थेटेगव्हाण येथे हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement