Advertisement

लोणीत मोरांच्या मृत्युचे सत्र कायम

प्रजापत्र | Saturday, 23/01/2021
बातमी शेअर करा

बीड दि.२३ (प्रतिनिधी)-शिरूर कासार तालुक्यातील लोणीमध्ये शुक्रवारी (दि.२२) पाच मोरांचा अज्ञात कारणाने मृत्यु झाल्याची घटना समोर आली होती.या मृतांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर आज (दि.२३) पुन्हा लोणीमध्ये आठ मोरांचा मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.


               बीड जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या आजाराने सध्या चांगलेच डोके वर काढले असून आतापर्यंत अनेक पक्षी,कोंबड्यांना प्राण गमवावे लागले आहेत.लोणीत शनिवारी (दि.२३) पाच मोरांचा मृत्यु झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे शिरूर तालुका अधिकारी डॉ.प्रदीप आघाव यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते.दरम्यान शनिवारी तर दादाबा महार्नोर यांच्या शेतातील परिसरात आठ मोर मृतवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.दरम्यान दोन दिवसात लोणीत १३ मोर मृत पावल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या मृतांचे अहवाल ३० जानेवारीपर्यंत प्राप्त होतील अशी प्राथमिक आहे.

 

बर्ड फ्लू की विषबाधा
लोणीमध्ये आतापर्यंत १३ मोर मृत पावल्याने खळबळ उडाली असून या मोरांचा मृत्यु बर्ड फ्लू की विषबाधाने झाला हे अद्याप समोर आले नाही.पशुसंवर्धन विभागाने मृत मोरांच्या जवळ हरभारे आणि इतर काही काही धान्य आढळून आले असून या धान्यावर कीटनाशक फवारणी केल्यामुळे आणि ते मोरांनी खाल्यामुळे त्यांचा मृत्यु होण्याची शक्यता ही नाकारत  येणार नसल्याचे आघाव यांनी म्हटले आहे.दरम्यान मोरांसोबत त्यांनी खालेल्या पदार्थांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती श्री.आघाव यांनी 'प्रजापत्र' शी बोलताना दिली.  

 

Advertisement

Advertisement