Advertisement

मांसविक्री थांबवून कुकुटपक्षी शहराबाहेर हलविण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश

प्रजापत्र | Wednesday, 13/01/2021
बातमी शेअर करा

शिरूर कासार-बर्ड फ्लू संसर्गाचा होणारा संभाव्य धोका लक्षात घेता शिरूर कासार शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी लोकवस्तीमध्ये होत असलेली मांसविक्री आणि कुकुट पक्षी शहराबाहेर घेऊन जाण्याचे आदेश मुख्याधिकारी किशोर सानप यांनी संबंधितांना दिले आहेत.

तालुक्यातील सीमारेषेवर असणाऱ्या मिडसांगवी गावात आणि मुगगाव येथे बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाने अनेक कोंबड्या आणि पक्षांचा मृत्यु झाला होता.शिवाय त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी देखील बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी आदेश दिले आहेत.शहरात या आजाराचा धोका टाळण्यासाठी तसेच पशु पक्षांच्या माध्यमातून मानवात संक्रमण होऊ नये यासाठी नगरपंचायतचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी लोकवस्ती मध्ये उघड्यावर होणारी मांसविक्री आणि कुकुट पक्ष्यांचे स्थलांतर करण्याचे आदेश चिकन विक्रेते व कुकुटपालन मालक यांना दिले आहेत.

प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना
नगरपंचायत हद्दीत ज्यांची चिकन विक्रीची दुकाने आहेत तसेच कुकुटपालन आहे अशा लोकांना आपली दुकाने आणि कुकुटपक्षी शहराबाहेर हलविण्याचे आदेश दिले आहेत.बर्ड फ्लूचा होणारा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी महत्त्वाची असल्यामुळे सर्व व्यावसायिकांना आदेशीत करण्यात आले आहे.
किशोर सानप
(मुख्याधिकारी,शिरुर नगरपंचायत)

Advertisement

Advertisement